हिंजवडी – २४X ७ लाइफस्टाइल ने भरलेलं प्रॉपर्टी डेस्टिनेशन

पुण्यातील हिंजवडी भाग त्याच्या लोकेशन मुळे आणि शहराच्या इतर अनेक महत्त्वाच्या भागांशी थेट संपर्क होऊ शकत असल्यामुळे सर्वांच्या पसंतीला उतरला आहे. येथून मुंबई ला पोचणेही सहज शक्य असल्यामुळे हिंजवडीच्या महत्वात भर पडली आहे. घर घेऊ इच्छिणा-या ग्राहकांना हिंजवडी भाग का आकर्षक वाटतो याचा इथे विचार करूया

हिंजवडी भाग हा चांगला विकसित भाग असून तेथे घर घ्यावे अशी बहुसंख्य ग्राहकांची आकांक्षा असते. पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या भरभराटीचा हिंजवडीला मोठा फायदा झाला आहे.  अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी भागात आपली कार्यालये सुरु केली आहेत. यामुळे या झपाट्याने विकसित होत असलेल्या भागात राहण्याची आकांक्षा बाळगणा-या परदेशी व्यवसायिकांच्याही संख्येतही मोठी वाढ झाली आहे.  

गेल्या काही दशकांत पुण्याच्या ग्रामीण भागाचे रूप झपाट्याने पालटले असून ग्रामीण भागात अनेक आधुनिक व्यापारी आणि निवासी इमारती उभारल्या गेल्या आहेत. व्यापारी आणि निवासी इमारतींच्या विस्ताराबरोबरच हिंजवडीतील अनेक पायाभूत सोयींचाही विस्तार झाला आहे आणि शिक्षणसंस्था, रुग्णालये तसेच इतर अनेक गरजेच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. हिंजवडीची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लोकेशन, पुण्यातील महत्त्वाच्या भागांशी असलेला थेट सम्पर्क आणि अगदी जवळ असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (एक्सप्रेसवे).  मुंबईहून पुण्याला ड्राइव्ह करत जाताना हिंजवडी पार करावीच लागते.

हिंजवडीजवळ महाळुंगे येथे पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरण  (PMRDA) पहिली नगर नियोजन योजना (टाऊन प्लॅनिंग स्कीम ) विकसित करीत आहे. अशा योजनांमध्ये निवासी, व्यापारी, औद्योगिक तसेच वाहनतळ, गोदामे इत्यादी लॉजिस्टिक्स व्यवसायाला आवश्यक अशा योजनांचा समावेश असेल. ” PMRDA प्रस्तावित हिंजवडी-शिवाजीनगर या २३.३ कि.मी. मेट्रो रेल्वेमार्गाला  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजुरी दिली आहे. गेल्या दशकभरात हिंजवडी हे मोठ्या आय टी कंपन्या, तारांकित हॉटेल्स, ऑफिस कॉम्प्लेक्स , निवासी प्रकल्प अशा सर्व त-हेच्या वैशिष्ट्यांसह बहरले आहे. पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी याना जोडणारा दुमजली उड्डाणपूल पूर्ण झाला की चिंचवड, थेरगाव आणि काळेवाडी येथील प्रवाशांना हिंजवडी आय टी पार्क ला पोचणे अधिक सोपे होणार आहे. या सर्व कारणांमुळेच हिंजवडी हा तरुण पिढीला आणि परगावाहून स्थलांतरित होणा-या नोकरदारांना एक सोयीस्कर आणि आकर्षक पर्याय ठरला आहे,” असे  साई इस्टेट कन्सल्टंट्स चे संचालक श्री अमित वधवानी म्हणतात.

 

हिंजवडीतील  गृहप्रकल्पांमध्ये सुविधांची रेलचेल

अनेक मान्यवर विकसक हिंजवडीत प्रकल्प उभारत आहेत. दर्जेदार बांधकाम आणि वेळेवर पझेशन ही या विकासकांची भक्कम ओळख असल्यामुळे हिंजवडीत घर घेणे नव्याने घर घेणा-याना आकर्षक ठरले आहे. या आय टी हब च्या अगदी जवळ आकार घेत असलेला गोदरेज ट्वेण्टीफोर हा असाच एक अत्याधुनिक सुखसोयी असलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सर्व सोयी चोवीस तास उपलब्ध असणे.  

प्रकल्पाच्या नावातून सहज लक्षात येते की त्यात २४ वेगवेगळ्या सुखसोयी २४ तास सातही दिवस उपलब्ध आहेत.  या सुखसोयींमध्ये आउटडोअर कॅफेटेरिया, स्पा-सौना, क्रिकेट पिच , सुपर मार्केट, मिनी थिएटर , इनडोअर गेम्स, व्हर्चुअल गॉल्फ सिम्युलेटर , लॉण्ड्रोमॅट, रेस्टोरंट , डिजिटल गेमिंग झोन, रॉक क्लाइम्बिंग, एटीएम / बँकिंग, स्विमिंग पूल, पूल लाउंज, जिम्नॅशियम , ब्रेकडाऊन सर्व्हिस, वर्कस्टेशन्स सह इंटरनेट सेवा , वाचनालय , औषधांचे दुकान, दवाखाना, / दिवसाचे रात्रीचे पाळणाघर , गेस्ट हाउस, ऍम्ब्युलन्स आणि कॉन्सिअर्ज अशा विविध सेवांचा समावेश आहे.  

 

राउंड द क्लॉक सेवा देणारे प्रॉपर्टी डेस्टिनेशन

वाढत्या वेगाच्या आजच्या जीवनक्रमात अनेक ऑफिस गोअर्स ना रात्री उशिरापर्यंत काम करत बसावे लागते. अशा परिस्थितीत, या प्रकल्पातील रहिवाशांना काम संपवून घरी येताना त्यांचे नेहमीचे दुकान बंद असलेले चालणार नाही किंवा त्यांना व्यायामासाठी वेळ असेल तेव्हा जिम बंद असल्यामुळे सकाळपर्यंत थांबणे कटकटीचे वाटेल. रात्री उशिरा व्यायाम संपवून पूल मध्ये डुबकी मारायचा आनंद मिळावा यासाठी ज्यादा पैसे मोजण्याची आपल्यापैकी बहुतेकांची तयारी असते. यामुळेच, गोदरेज २४X७ प्रकल्पातील सर्व सुखसोयी चोवीस तास उपलब्ध असतील.  

या प्रकल्पातील  घरे नुसती ‘स्मार्ट होम्स’ नसतील तर नव्या युगातील घराना पूरक अशी सर्व यंत्रणा – स्मार्ट ऑटोमेशन सिस्टिम्स, आपल्या आवडीनुसार घराची अंतर्गत रचना आणि इतर अनेक सुविधांसह –  तिथे उपलब्ध असेल. याशिवाय, हिंजवडीतल्या प्रॉपर्टी ला गुंतवणूक म्हणून फार मोठा वाव आहे कारण या गुंतवणुकीचे मूल्य सतत वाढत जाणार आहे. अमित गुप्ता यांनी हिंजवडीत घर खरेदी करायचे ठरवले आहे. ते म्हणतात की या परिसरात उत्तम शाळा, वैद्यकीय सुविधा, हॉटेल्स उपलब्ध आहे आणि शिवाय येथून ऑफिस जवळ आहे. “सुरुवातीला काही काळ भाड्याच्या घरात राहिल्यानंतर आम्ही घर घेण्यासाठी या भागाची निवड केली. हिंजवडीत किंमत आणि सुविधा यानुसार अनेक विविध गृहप्रकल्प  उभे राहत आहेत. यामुळे ग्राहकांना निवड करण्यासाठी मोठा वाव आहे,” असे ते सांगतात.

 

Was this article useful?
  • 😃 (1)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशावास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशा
  • डिकोडिंग रेसिडेन्शियल मार्केट ट्रेंड Q1 2024: सर्वाधिक पुरवठा खंड असलेली घरे शोधणे
  • या वर्षी नवीन घर शोधत आहात? सर्वात जास्त पुरवठा असलेल्या तिकिटाचा आकार जाणून घ्या
  • या स्थानांनी Q1 2024 मध्ये सर्वाधिक नवीन पुरवठा पाहिला: तपशील तपासा
  • या मातृदिनी तुमच्या आईला या 7 भेटवस्तूंसह एक सुधारित घर द्या
  • मदर्स डे स्पेशल: भारतातील घर खरेदीच्या निर्णयांवर तिचा प्रभाव किती खोलवर आहे?