वास्तूनुसार स्वयंपाकघराची दिशा: या महत्त्वाच्या वास्तुशास्त्र मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

घरात स्वयंपाकघर, असे स्त्रोत आहे जेथे घरातील रहिवाशांचे पोषण करणारे अन्न शिजवले जाते. आपण घराच्या या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी वास्तूनुसार काय करावे आणि काय करू नये ते बघुया

आज आधुनिक घरात स्वयंपाकघर, क्रिया प्रक्रियांचे केंद्र आहे. स्वयंपाकघर हे अत्याधुनिक उपकरणांसह चांगले डिझाइन केलेले क्षेत्र आहेत, जेथे कुटुंबातील सदस्य स्वयंपाक करताना मित्र आणि कुटुंबासह एकत्र येतात आणि सामाजिक बनताना दिसतात.

Table of Contents

वास्तूनुसार स्वयंपाकघराची योग्य दिशा म्हणजे घराचा आग्नेय कोपरा, ज्यावर अग्निदेवता किंवा अग्निदेवतेचे राज्य असते. अशाप्रकारे, वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही स्वयंपाकघरातील आदर्श जागा आहे.

 

स्वयंपाकघरासाठी वास्तू

 

वास्तुनुसार स्वयंपाकघराची दिशा

Important kitchen Vastu Shastra tips

 

वास्तूनुसार, एखाद्याच्या घरात पृथ्वी, आकाश, हवा, अग्नी आणि पाणी या घटकांचे योग्य संतुलन असले पाहिजे. “अग्नी किंवा अग्नि देवता‘, सूर्याशी निगडीत आहे, जे ऊर्जा आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. वास्तुनुसार अग्नि स्त्रोतांची नियुक्ती दक्षिण-पूर्व दिशेला असावी. म्हणून, स्वयंपाकघर घराच्या दक्षिण-पूर्व भागात असावे आणि स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करावे. स्वयंपाक करताना तुमचे तोंड असण्याची पर्यायी दिशा पश्चिम ही आहे. सिंक मुख्यता स्वयंपाकघराच्या उत्तर-पश्चिम भागात ठेवावा. पाण्याची भांडी आणि वॉटर प्युरिफायर ईशान्य दिशेला ठेवा.” असे वास्तुप्लसचे मुंबईस्थित नितीन परमार म्हणतात.

चांगले आरोग्य आणि समृद्धीसाठी स्वच्छ, प्रशस्त आणि गोंधळमुक्त स्वयंपाकघर आवश्यक आहे. स्वयंपाकघरात खिडक्या असणे आवश्यक आहे आणि हवादार असणे आवश्यक आहे आणि पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. गोंधळ टाळण्यासाठी आणि स्वयंपाक करताना पुरेशी जागा मिळण्यासाठी स्वयंपाकघराची रचना किमान स्वच्छ, साध्या ओळींची असावी. स्टोरेज स्पेस, स्वयंपाकघरच्या शक्य तितक्या पश्चिम आणि दक्षिण भिंतींवर असावी.

स्वयंपाकघरात नळ किंवा पाईपमधून पाणी टपकणे, हे सूचित करते की संपत्ती एखाद्याच्या जीवनातून काढून टाकली जात आहे आणि ते त्वरित दुरुस्त केले पाहिजे. समृद्धीसाठी नेहमी अर्ध्याहून अधिक तांदळाची भांडी घरात भरून ठेवा. जुन्या वर्तमानपत्रांवर साठवणुकीच्या कोठ्या  ठेवणे टाळा. स्वयंपाकघराच्या ईशान्य भागात डस्टबिन ठेवू नका आणि डोक्यावरच्या तुळईखाली स्वयंपाक करणे टाळा,” असे परमार पुढे म्हणतात.

हे देखील पहा: नवीन अपार्टमेंट निवडण्यासाठी वास्तु टिपा

 

स्वयंपाकघराची दिशा

विश्वाच्या नैसर्गिक नियमांशी सुसंगत इमारतींच्या रचना आणि बांधकामाचा पुरस्कार करणारे वास्तूशास्त्राचे खुल्या आणि बंद स्वयंपाकघरासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे आहेत, जेणेकरून घरात योग्य प्रकारची ऊर्जा आणि सकारात्मकता असेल. घरातील रहिवाशांच्या आरोग्यासाठी आणि इतर फायद्यांसाठी स्वयंपाकघरातील वातावरण खूप महत्वाचे आहे, असे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष तज्ञ, जयश्री धमाणी म्हणतात.

“आरोग्य ही संपत्ती आहे आणि वास्तूशास्त्रानुसार योग्य दिशेने, गोष्टींचे योग्य स्थान निश्चित करणे महत्वाचे आहे. ही फायरप्लेस आहे जी घराची ऊर्जा शुद्ध करते आणि अशा प्रकारे तेथे शिजवलेले अन्न शरीराला इंधन आणि पोषण देते. त्यामुळे अग्नि परिपूर्ण दिशेने ठेवावी लागते. स्वयंपाकघर उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पश्चिम मध्ये नसावेत, पुढे धमानी स्पष्ट करतात.

स्वयंपाकघराचा आकार देखील महत्त्वाचा आहे. ते फार लहान नसावे. श्रेयस्कर आकार ८० चौरस फूट किंवा त्याहून अधिक आहे. जर स्वयंपाकघर खूप लहान असेल तर घरातील महिलांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.

 

स्वयंपाकघरात वेंटिलेशन आणि खिडक्या

स्वयंपाकघरात अयोग्य वायुवीजन असल्यास, यामुळे घरातील स्त्री किंवा स्वयंपाकघरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला आरोग्याच्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

स्वयंपाकघरात, वास्तूनुसार खिडक्यांची योग्य स्थिती, सकारात्मक वातावरण सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हवा बाहेर काढण्यासाठी योग्य खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन किंवा आधुनिक चिमणीच्या रूपात एअर आउटलेट महत्वाचे आहेत. चांगला प्रकाश आणि हवा मिळाल्याने अन्नाचा दर्जा चांगला होतो.

वास्तुनुसार स्वयंपाकघरातील खिडक्यांसाठी, पूर्वेकडे सर्वोत्तम दिशा आहे. एक्झॉस्ट फॅन देखील पूर्वेला ठेवता येतो.

पूर्वाभिमुख घरासाठी किचन वास्तू बद्दल देखील वाचा

 

किचनसाठी वास्तू: ओपन किचन लेआउटसाठी टिपा

खुल्या स्वयंपाकघराच्या संकल्पनेला अनेक भारतीय कुटुंबांकडून प्राधान्य मिळत आहे, विशेषत: जे अनेक वर्षांपासून परदेशात वास्तव्य करत आहेत. वास्तूनुसार स्वयंपाकघरातील जागा निवडण्यापूर्वी, खुल्या स्वयंपाकघरातील लेआउटसाठी येथे काही वास्तु टिपा आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत:

  • खुल्या स्वयंपाकघरसाठी आदर्श क्षेत्र दक्षिण-पूर्व आहे, कारण दक्षिण आणि पूर्व दोन्ही दिशांना अग्नी घटकाचा प्रभाव आहे.
  • उत्तर क्षेत्रातील स्वयंपाकघरातील खुल्या मांडणी टाळल्या पाहिजेत, कारण यामुळे करिअर, वाढ आणि पैशाच्या नवीन संधींवर परिणाम होतो.
  • खुल्या स्वयंपाकघर मांडणीसाठी पश्चिम क्षेत्र देखील चांगले मानले जाते. हे शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या नफा आणि चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देते.

हे देखील पहा: वास्तूनुसार स्वयंपाकघरातील योग्य रंग कसा निवडावा

 

स्वयंपाकघर उपकरणांसाठी वास्तु

प्रकार योग्य दिशा
प्रवेशद्वार उत्तर, पूर्व किंवा पश्चिम
गॅस सिलेंडर आग्नेय
स्वयंपाकाचा गॅस आग्नेय कोपरा
रेफ्रिजरेटर आग्नेय, दक्षिण, उत्तर किंवा पश्चिम
उपकरणे (उदा., हीटर, पारंपारिक ओव्हन, मायक्रोवेव्ह, ओव्हन) आग्नेय, दक्षिण
स्टोरेज रॅक पश्चिम किंवा दक्षिण भिंत
बेसिन ईशान्य कोपरा
खिडक्या आणि एक्झॉस्ट फॅन पूर्व दिशेला
घड्याळे दक्षिण किंवा नैऋत्य भिंत

 

स्वयंपाकघरासाठी वास्तु रंग

स्वयंपाकघरातील भिंतीसाठी रंग दर्शवतात
पिवळा आनंदी आणि सकारात्मक
पेस्टल शेड्स कळकळ आणि प्रेम
हलका तपकिरी स्थिरता
स्वयंपाकघरातील कॅबिनेट, जमीन आणि स्लॅबसाठी रंग
लिंबूसारखा पिवळा, केशरी किंवा हिरवे कॅबिनेट ताजेपणा, चांगले आरोग्य
सिरेमिक टाइल्स, मोज़ेक किंवा मार्बल फ्लोअरिंग सकारात्मकता
क्वार्ट्ज किंवा ग्रॅनाइट स्लॅब संतुलित वातावरण

 

स्वयंपाकघर शुद्धतेचे प्रतीक आहे. म्हणून, वास्तुशास्त्रानुसार पांढरा सर्वोत्तम रंग आहे परंतु पांढरा रंग जास्त वापरू नका. एकतर स्वयंपाकघरात जास्त लाल रंग वापरू नये, कारण यामुळे अस्थिर ऊर्जा निर्माण होते. गडद रंग वापरणे टाळा कारण ते नैराश्याला कारणीभूत ठरू शकतात. स्वयंपाकघरासाठी शिफारस केलेले आदर्श रंग हिरवे, लिंबासारखे पिवळे आणि नारंगी आहेत कारण हे रंग पौष्टिकता आणि आगीचे रंग दर्शवतात. संतुलन निर्माण करण्यासाठी स्वयंपाकघरातील छतामध्ये पांढरा रंग निवडा. स्वयंपाकघरात काळा, राखाडी आणि निळा रंग वापरणे टाळा. “जर एखाद्याकडे वेगळी पूजेची खोली नसेल, तर स्वयंपाकघरात, शाकाहारी अन्न शिजवले जात असेल तर उत्तर/पूर्व कोपऱ्यात एक मंदिर असू शकते. जर मांसाहारी अन्न बनवले जात असेल तर स्वयंपाकघरात मंदिर न ठेवणे चांगले आहे,” धामणी सांगतात. वास्तुशास्त्राची तत्त्वे सुचवतात की एखादी व्यक्ती स्टोव्हच्या डावीकडे किंवा उजवीकडे मंदिर ठेवू शकते. मंदिराच्या समोर स्टोव्ह ठेवणे टाळा आणि कधीही स्टोव्ह किंवा स्वयंपाकघरातील बेसिनच्या वर मंदिर ठेवू नका. स्वयंपाकघरात काळा रंग वापरू नका. लाइट पेस्टल शेड्स आदर्श आहेत.

हे देखील पहा: जेवणाच्या आणि लिव्हिंग रूमसाठी वास्तुशास्त्र टिपा

 

किचन स्लॅबसाठी वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील स्लॅबसाठी ग्रॅनाइटऐवजी विशेषत: काळ्या रंगातील दगड किंवा संगमरवर वापरणे चांगले आहे. स्वयंपाकघरतील स्लॅबसाठी निवडायचा रंग स्वयंपाकघर कोणत्या दिशेला आहे यावर अवलंबून आहे. जर स्वयंपाकघर पूर्वेला असेल तर हिरवा किंवा तपकिरी रंगाचा स्लॅब योग्य  आहे. ईशान्येकडील स्वयंपाकघरसाठी, पिवळ्या रंगातील स्लॅबची निवड करा. दक्षिण किंवा दक्षिण-पूर्व दिशेकडील स्वयंपाकघरासाठी, तपकिरी, लाल किंवा हिरव्या रंगातील स्लॅब सर्वोत्तम आहेत. पश्चिमेला असलेल्या  स्वयंपाकघरसाठी राखाडी किंवा पिवळ्या रंगाच्या स्लॅबची शिफारस केली जाते. उत्तरेकडील  स्वयंपाकघराच्या स्लॅबसाठी हिरवा रंग योग्य आहे, तरी मुख्यतः आपण उत्तर भागात स्वयंपाकघर असणे टाळले पाहिजे.

 

स्वयंपाकघरासाठी वास्तू: काय करावे आणि काय करू नये

  • स्वच्छतागृहांच्या खाली किंवा वर स्वयंपाकघर असू नये.
  • वास्तु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्वयंपाकघर कधीही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून असू नये.
  • स्वयंपाकघरात औषधे ठेवू नका.
  • स्वयंपाकघर नियमित स्वच्छ करा. जमीन पूर्णपणे साफ करा आणि सर्व नको असलेल्या गोष्टी टाकून द्या. चेपलेले किंवा तुटलेले कप, डिश किंवा भांडी कधीही ठेवू नका. दररोज नेहमी झोपण्यापूर्वी आपले स्वयंपाकघर आणि भांडी स्वच्छ करा.
  • कचरापेटी नेहमी झाकणाने झाकलेली आहे आणि डस्टबिन नियमितपणे साफ केले जाते याची खात्री करा.
  • टाकाऊ साहित्य, जसे की जुनी वर्तमानपत्रे, चिंध्या आणि नको असलेल्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवणे टाळा.
  • स्वयंपाकघरातील खिडकीजवळ तुळशी, पुदिना, बांबू किंवा कोणतीही हर्बल वनस्पती ठेवा. काटेरी झाडे टाळा, कारण यामुळे वातावरणात तणाव निर्माण होतो.
  • अन्नपूर्णा (अन्नाची देवी) ची छोटी मूर्ती तांदळाच्या भांड्यात ठेवा. अन्नपूर्णा देवीचे चित्र किंवा फळांचे चित्र देखील ठेवू शकता, जे स्वयंपाकघरात धनधान्य भरपूर प्रमाणात असणे सुनिश्चित करते.
  • फळांची एक टोपली स्वयंपाकघराच्या उत्तरेला ठेवली पाहिजे, कारण ती विपुलतेचे प्रतीक आहे.
  • स्वयंपाकघरात नेहमी मीठ, हळद, तांदूळ आणि पीठ असावे. ते संपण्यापूर्वी पुन्हा भरून ठेवा असा वास्तूचा सल्ला आहे.
  • वास्तुनुसार स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवू नका. मीठ एका काचेच्या भांड्यात किंवा बरणीत ठेवा. यामुळे घरात शांतता राहते आणि आर्थिक समस्याही दूर राहतात.
  • स्वयंपाकघर सकारात्मक ऊर्जेने भरण्यासाठी, स्वयंपाकघरात चांगला वास येत असल्याची खात्री करा. आपण लिंबाची साले, संत्र्याची साले किंवा दालचिनीच्या काड्या उकळून नैसर्गिक एअर फ्रेशनर बनवू शकता.
  • स्वयंपाकघरातील स्टोव्हचे बर्नर स्वच्छ ठेवा, कारण यामुळे घरामध्ये रोख रक्कमेचा प्रवाह सुरळीत राहतो.
  • नकारात्मकता बाहेर पडण्यासाठी स्वयंपाकघरात एक खिडकी असावी. तसेच, नकारात्मक उर्जा बाहेर जाऊ देण्यासाठी खिडकीच्या वर पूर्व दिशेने एक एक्झॉस्ट स्थापित करा.
  • वास्तुनुसार, आपल्या स्वयंपाकघरातील प्रवेशद्वार किंवा दरवाजा पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावा.
  • वास्तूनुसार स्वयंपाकघराची स्थिती ठरवताना, स्वयंपाकघराचे दार नेहमी घड्याळाच्या दिशेने उघडावे याची खात्री करा.
  • स्वयंपाकघरातील आगीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व वस्तू जसे गॅस स्टोव्ह, सिलेंडर, मायक्रोवेव्ह ओव्हन, टोस्टर इत्यादी स्वयंपाकघरच्या दक्षिण-पूर्व भागात ठेवल्या आहेत याची खात्री करा.
  • वॉशबेसिन आणि कुकिंग रेंज कधीही एकाच व्यासपीठावर किंवा स्वयंपाकघरात एकमेकांना समांतर ठेवू नये. आग आणि पाणी दोन्ही विरोधी घटक असल्याने, ते जोडपे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे आणि मतभेद निर्माण करू शकतात.
  • जर तुम्हाला स्वयंपाकघरात रेफ्रिजरेटर ठेवायचे असेल तर ते दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे, कारण हे तुम्हाला जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यास मदत करेल. फ्रीज सुव्यवस्थित, स्वच्छ ठेवा आणि ते फार भरलेले नाही याची खात्री करा. जर तुम्ही पाण्याने भरलेल्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्या नियमितपणे स्वच्छ पाण्याने भरा.
  • धान्य आणि दैनंदिन वस्तूंचा साठा करण्यासाठी, स्वयंपाकघराच्या नैऋत्य दिशेला प्राधान्य द्या, कारण ते शुभेच्छा आणि समृद्धीला आमंत्रित करते. रिकामे डबे टाकून द्या किंवा त्यात काही धान्य भरा. रिकामे भांडे ठेवायचे असल्यास उत्तर किंवा पूर्व किंवा अगदी ईशान्येला ठेवा.
  • सकारात्मक उर्जेचा प्रसार करत राहण्यासाठी, तुमच्या स्वयंपाकघरातील कॅबिनेट, ड्रॉवर्स आणि इतर स्टोरेज क्षेत्रे नियमितपणे स्वच्छ करा. जुनी फूड पॅकेट्स, शिळ्या गोष्टी, चिरलेल्या प्लेट्स किंवा अगदी काम न करणारी उपकरणे काढून टाका.
  • स्वयंपाकघराच्या दक्षिण-पूर्व आणि दक्षिण भागात तूप आणि स्वयंपाकाचे तेल साठवणे फायदेशीर आहे, कारण असे मानले जाते की यामुळे स्वयंपाकघर नेहमी अन्नाने भरलेले असेल.
  • स्वयंपाकघर वास्तू नुसार, चाकू आणि कात्री झाकून किंवा शेल्फच्या आत ठेवल्या पाहिजेत. त्यांना उघड्यावर ठेवल्याने कुटुंब आणि मित्रांशी कटु संबंध निर्माण होऊ शकतात. नात्यांमधिल विरसता टाळण्यासाठी लोणचे नेहमी झाकलेल्या जागी ठेवा.
  • वास्तुशास्त्रानुसार शू रॅक किचनजवळ कधीही ठेवू नका. स्वयंपाकघरात शूज घालणे टाळा. जर एखाद्याला चप्पल घालायची असेल तर फक्त घरीच वापरण्यासाठी वेगळी जोडी ठेवा.

 हे देखील पहा: संरचनात्मक बदल न करता घराची वास्तू कशी सुधारता येईल?

 

वास्तू नूसार किचन कॅबिनेट

कोणत्याही स्वयंपाकघरासाठी, वास्तूनुसार कॅबिनेटची स्थिती देखील घरातील उर्जेच्या प्रवाहावर प्रभाव पाडते. दक्षिण आणि पश्चिम स्वयंपाकघरातील भिंतींमध्ये जास्तीत जास्त कॅबिनेट डिझाइन करा. किचन कॅबिनेटच्या वर मोकळी जागा सोडल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते. स्वयंपाकघरातील कॅबिनेट कमाल मर्यादेपर्यंत पसरत नसल्यास, त्यावर झाडे किंवा सजावटीच्या वस्तू ठेवा.

पूर्वेकडील स्वयंपाकघर कॅबिनेटसाठी हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या छटा वापरा.

दक्षिण आणि दक्षिण पूर्व कॅबिनेटसाठी, लाल, मरून, गुलाबी, नारिंगी आणि तपकिरी रंग आदर्श आहेत.

पश्चिमेकडील स्वयंपाकघरातील कॅबिनेटसाठी, चांदीचा आणि पांढरा रंग आदर्श रंग आहेत

उत्तरेकडील स्वयंपाकघरासाठी निळा, हिरवा आणि तपकिरी रंग निवडा.

 

स्वयंपाकघरचे डिझाइन आणि सजावट टिपा

  • संपूर्ण पांढरे स्वयंपाकघर टाळा, कारण यामुळे जागा निस्तेज आणि थंड दिसते. स्वयंपाकघर नेहमी स्वागत करनारे दिसायला हवे.
  • गडद रंगात खूप जास्त कॅबिनेट बांधू नका, कारण यामुळे जागा अरुंद आणि आक्रमक दिसू शकते.
  • वास्तु तत्त्वांनुसार स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्मची स्थिती ठेवा. स्वयंपाकघराच्या वास्तूनुसार, स्वयंपाकघराच्या उत्तर भिंतीला स्पर्श करणारे प्लॅटफॉर्म टाळले पाहिजेत परंतु दक्षिणेकडील भिंतीवर प्लॅटफॉर्म वाढवता येऊ शकतात.
  • जर स्वयंपाकघरात माचीची (लॉफ्ट) आवश्यकता असेल, तर ती पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर असावी आणि पूर्व किंवा उत्तरेकडे नसावी.
  • वास्तुनुसार, स्वयंपाकघरात पाण्याने भरलेले भांडे ठेवल्याने आर्थिक संकट दूर राहण्यास मदत होते. जर कोणी मातीचे मोठे भांडे ठेवू शकत नसेल तर लहान भांड्याची निवड करा. ते पाण्याने भरा आणि उत्तर किंवा ईशान्य भागात ठेवा.
  • जर तुम्हाला कालातीत देखावा हवा असेल तर सजावटीच्या डिकल्स टाळा कारण ते लवकरच ट्रेंडच्या बाहेर जाऊ शकतात.
  • लहान स्वयंपाकघरात गडद रंग वापरू नका कारण यामुळे जागा लहान दिसते.
  • उंच कॅबिनेट आणि कमी छत हे चांगले जुळत नाहीत, कारण एक दुसऱ्याची भासमानता कमी करेल.
  • स्टोव्ह आणि सिंक एकमेकांच्या जवळ असल्यास, एक वास्तू उपाय म्हणून त्यांच्यामध्ये चिनीमातीची फुलदाणी ठेवा.
  • नैसर्गिक प्रकाशासाठी खिडक्या पूर्व किंवा उत्तरेस उघडल्या जात आहेत याची खात्री करा.
  • स्वयंपाकघरातील जमिनीचा रंग पिवळा, नारंगी, गुलाब, चॉकलेटी किंवा लाल असावा.
  • स्वयंपाकघराची रचना अशी असावी की गॅस बर्नर स्वयंपाकघराच्या मुख्य दरवाजासमोर नसेल.
  • स्वयंपाकघरात झाडू ठेवणे टाळा आणि कधीही सरळ ठेवू नका. नेहमी जमिनीवर ठेवा.

 

वास्तूनुसार स्वयंपाक करताना कोणत्या दिशेला तोंड असावे?

स्वयंपाक करताना पूर्व दिशेला तोंड करावे. अशाप्रकारे, गॅस शेगडी आणि उपकरणे यांसारख्या स्वयंपाकघरातील वस्तू स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करून ठेवाव्यात. स्वयंपाक करताना पश्चिम ही पर्यायी दिशा आहे. स्टोव्हची जागा सिंकच्या जवळ असल्यास, वास्तु उपाय म्हणून मध्ये एक बोन चायना फुलदाणी ठेवा.

 

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील वास्तु उपाय

स्वयंपाकघरातील वास्तुदोषासाठी येथे काही सोपे उपाय आहेत परंतु वास्तु तज्ञाचा सल्ला घेणे आणि संपर्क करणे केव्हाही चांगले.

  • जर स्वयंपाकघर उत्तर-पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर, स्टोव्हच्या वर ठेवलेल्या ज्युपिटर क्रिस्टल पिरॅमिडमुळे वास्तुदोषाची नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते.
  • स्टोव्हची जागा वास्तुशास्त्रानुसार नसल्यास, स्टोव्हच्या समोरील भिंतीवर तीन झिंक पिरॅमिडचा संच चिकटवा.
  • वास्तूनुसार, जर स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा असेल आणि एखादी व्यक्ती बदलू शकत नसेल तर स्टोव्हच्या खाली पांढऱ्या टाइल्स लावा.
  • ज्या स्वयंपाकघरात घराच्या मुख्य दरवाजाकडे तोंड करण्याचा वास्तुदोष आहे, त्यासाठी मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघराचा दरवाजा यांच्यामध्ये छतावर ५० मिमीचा क्रिस्टल लटकवावा.
  • पाण्याची साठवण टाकी चुकीच्या ठेवल्याने होणारा वास्तुदोष कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील छताच्या चार कोपऱ्यांवर ५० मिमीचा स्फटिक लटकवा.
  • विद्युत उपकरणे आग्नेय दिशेशिवाय इतर दिशेला ठेवली असल्यास, विद्युत उपकरणांच्या बाजूला मंगळाचा क्रिस्टल पिरॅमिड चिकटवा.
  • जर स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल जर वास्तू अनुकूल नाही, तर वास्तुदोषाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ते पिवळ्या रंगात रंगवण्याचा सल्ला दिला जातो.
  • स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृह यांची समान भिंत असल्यास, वास्तुदोषाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी, स्वयंपाकघर आणि स्नानगृहात सामाईक असलेल्या भिंतीच्या दोन्ही बाजूंना जस्त धातूचा ‘नऊ पिरॅमिड’ चिकटवावा.
  • मंदिर किंवा पूजा कक्ष स्वयंपाकघर सिंकच्या वर असल्यास मंदिरात क्रिस्टल आणि पिवळा दिवा लावणे हा एक सोपा उपाय आहे.
  • वास्तुदोष दुरुस्त करण्यासाठी, तुम्ही बारीक न केलेले समुद्री मीठ कमी प्रमाणत देखील ठेवू शकता. हे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. वाडग्यातील मीठ नियमितपणे बदला.
  • स्वयंपाकघराचा दरवाजा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या मागे नसावा. दरवाजा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उघडला पाहिजे. हे शक्य नसल्यास, स्टोव्हच्या समोरील भिंतीवर तीन झिंक ज्युपिटर क्रिस्टल पिरॅमिड्स लावणे हा एक वास्तु उपाय आहे.

 

स्वयंपाकघराच्या वास्तू बद्दल सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

  • स्वयंपाकघरात गॅस शेगडी कुठे ठेवावी?

स्टोव्ह आग्नेय दिशेला ठेवावेत, कारण हा कोपरा आग दर्शवतो.

  • स्वयंपाकघरात बेसिन कोठे ठेवावा?

स्वयंपाकघरातले बेसिन उत्तर किंवा ईशान्य दिशेने ठेवावे.

  • स्वयंपाकघरासाठी कोणती दिशा सर्वोत्तम आहे?

स्वयंपाकघरासाठी आग्नेय ही सर्वोत्तम दिशा आहे.

  • मी माझ्या स्वयंपाकघरात माझे डस्टबिन कुठे ठेवायचे?

नैऋत्य, पश्चिम किंवा वायव्य, डस्टबिन ठेवण्यासाठी आदर्श दिशा आहेत.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

वास्तुनुसार स्वयंपाकघरातील स्लॅबसाठी कोणता रंग चांगला आहे?

किचन प्लॅटफॉर्मसाठी आदर्श रंग पिवळा, केशरी आणि हिरवा आहे.

स्वयंपाकघरासाठी कोणती दिशा वाईट आहे?

उत्तर किंवा ईशान्य दिशेला स्वयंपाकघर वापरण्याची शिफारस केलेली नाही, कारण ती एखाद्याच्या करिअर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करू शकते. त्याचप्रमाणे, दक्षिण-पश्चिम देखील स्वयंपाकघरासाठी योग्य नाही, कारण यामुळे वैवाहिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो.

मी स्वयंपाकघरात कचरा कोठे ठेवू?

कचऱ्याचे डबे नैऋत्य, पश्चिम किंवा वायव्य दिशेला ठेवा.

मी स्वयंपाकघरात लकी बांबू रोप ठेवू शकतो का?

होय, जर स्वयंपाकघर घराच्या पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला असेल तर. उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी तीन, पाच किंवा सात देठ असलेल्या बांबूची निवड करा.

दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करणे ठीक आहे का?

वास्तुनुसार स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड करणे टाळा कारण त्यामुळे आर्थिक संकटे येऊ शकतात. स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करणे ही सर्वोत्तम दिशा आहे.

(अरुणा राठोड यांच्या माहितीसह)

 

Was this article useful?
  • 😃 (2)
  • 😐 (1)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशावास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशा
  • रुस्तमजी ग्रुपने मुंबईतील वांद्रे येथे आलिशान निवासी प्रकल्प सुरू केला
  • नरेडको 15, 16 आणि 17 मे रोजी "RERA आणि रिअल इस्टेट एसेंशियल" आयोजित करणार आहे
  • पेनिन्सुला लँड अल्फा अल्टरनेटिव्ह्ज, डेल्टा कॉर्प्ससह रियल्टी प्लॅटफॉर्म सेट करते
  • JSW पेंट्सने आयुष्मान खुरानासोबत iBlok वॉटरस्टॉप रेंजसाठी मोहीम सुरू केली
  • आर्थिक वर्ष 24 मध्ये सूरज इस्टेट डेव्हलपर्सच्या एकूण उत्पन्नात 35% वाढ झाली आहे