मालमत्ता कर: महत्व, कॅल्क्युलेशन आणि ऑनलाईन पेमेंट


मालमत्ता कर कसा लावला जातो आणि तो भरण्याचे घरमालकाला काय फायदे आहेत? एक परीक्षण

जेव्हा आपण घर विकत घेतो, तेव्हा अनेक कर खरेदीदाराला भरावे लागतात. स्टॅंप ड्यूटी आणि रेजिस्ट्रेशन फक्त एक वेळा भरावे लागतात, तर मालमत्ता कर दरवर्षी घरमालकाने भरणे आवश्यक आहे.

 

प्रॉपर्टी टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो

मालमत्तेच्या मालकाने स्थानिक संस्थेकडून (उदाहरणार्थ, नगरपालिका) आकारलेला कर भरणे आवश्यक आहे आणि हा कर प्रॉपर्टी टॅक्स/मालमत्ता कर म्हणून ओळखला जातो. हा कर भिन्न जागांसाठी भिन्न असू शकतो आणि मालमत्ता कर निश्चित करण्याचे विविध घटक आहेत, जसे की:

  • मालमत्तेचे स्थान
  • मालमत्तेचा आकार
  • प्रॉपर्टी/मालमत्ता अंडर कंस्ट्रकशन आहे किंवा राहण्यास तयार आहे (रेडी टू मूव्ह)
  • मालमत्तेच्या मालकाचे लिंग – स्त्री मालकांसाठी सवलत असू शकते.
  • मालमत्तेच्या मालकाचे वय – ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत असू शकते.
  • महानगरपालिकेतर्फे परिसरात पुरविल्या जाणाऱ्या नागरी सेवा सुविधा.

 

मालमत्ता कर का भरावा लागतो?

स्थानिक स्वराज्य संस्था काही विशिष्ट सेवा पुरवते, जसे परिसरातील स्वच्छता, पाणी पुरवठा, स्थानिक रस्ते, ड्रेनेज आणि इतर नागरी सुविधा. प्रॉपर्टी टॅक्स स्थानिक स्वराज्य संस्था पुरवत असलेल्या सेवांसाठी लागणरा निधी मिळण्यास महसूल मिळवून देतो. मालमत्ता कर हा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महसूलाच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहे. आपण मालमत्ता कर भरला नाही तर, स्थानिक स्वराज्य संस्था पाण्याचे कनेक्शन किंवा इतर सेवा प्रदान करण्यास नकार देऊ शकते आणि योग्य रकमेची परतफेड करण्यासाठी कायदेशीर कारवाईसुद्धा करु शकते.

 

मालमत्ता कर भरण्याचे महत्व

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मालमत्तेच्या अलीकडच्या मूल्यानुसार मालमत्ता कराराचा हिशोब केल्या जातो. मालमत्ता कर भरण्यासाठी केवळ मालमत्तेचे मालक जबाबदार असतात. म्हणून, जर आपण भाडेकरू असाल, तर  आपल्याला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही.

मालमत्तेच्या विवादांच्या बाबतीत, मालमत्ता कराची पावती महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून जेंव्हा तुम्ही मालमत्तेची खरेदी करतात तेंव्हा, मालमत्तेचे हक्कसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रेकॉर्ड्समध्ये अद्ययावत करणे गरजेचे आहे. सर्व थकीत थकबाकी भरेपर्यंत, मालमत्ता नवीन खरेदीदारांकडे हस्तांतरित होऊ शकत नाही. जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रेकॉर्ड्समध्ये मालकी हक्काची नोंद अद्ययावत होत नाही तोपर्यंत, आधीच्या मालकाचे नाव कराच्या पावतीवर दिसेल.

आपल्या नावाची नोंद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रेकॉर्डवर करत असताना, आपल्याला मालमत्तेची मालकी सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे पुरवण्यास सांगितले जाऊ शकते. नावाची नोंद करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र, विक्रीची प्रत (सेल डिड कॉपी), सोसायटीकडून मंजुरी, योग्य रितीने भरलेला अर्ज, फोटो आणि पत्त्याचा पुरावा, मालमत्ता कर भरल्याची शेवटीची पावती इत्यादी आहे. मालमत्ता कराची पावती, कर्जाचा लाभ घेण्यासाठी एक मुख्य दस्तऐवज आहे.

म्हणून आपण वेळेवर मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे आणि आपले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रेकॉर्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे. काही स्थाने, जसे की उपासनास्थळे, सरकारी इमारती, परदेशी दूतावास इत्यादि, यांना सहसा मालमत्ता करात सूट मिळते. स्वच्छ जमीन देखील मालमत्ता करामधून वगळण्यात येते.

 

Citye-link to pay property tax
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकाhttps://ptghmconlinepayment.cgg.gov.in/PtOnlinePayment.do
पुणे महानगरपालिकाhttp://propertytax.punecorporation.org/
पीसीएमसीhttp://203.129.227.16:8080/pcmc/
नवी मुंबई महानगरपालिका

(एनएमएमसी)

https://www.nmmc.gov.in/property-tax2
म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई (एमसीजीएम)https://prcvs.mcgm.gov.in/
दिल्ली महानगरपालिका (एमसीडी)http://www.mcdpropertytax.in/
नोएडा ऑथॉरिटीhttps://www.noidaauthorityonline.com/
गुरगाव महानगरपालिकाhttp://www.mcg.gov.in/HouseTax.aspx
अहमदाबाद  महानगरपालिकाhttp://ahmedabadcity.gov.in/portal/web?requestType=ApplicationRH&actionVal=loadQuickPayPropertyTax&queryType=Select&screenId=1400001
कोलकाता महानगरपालिका(केएमसी)https://www.kmcgov.in/KMCPortal/jsp/KMCAssessmentCurrentPD.jsp
बृहत बेंगळुरू महानगर पालिका(बीबीएमपी)https://bbmptax.karnataka.gov.in/
ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनhttp://www.chennaicorporation.gov.in/online-civic-services/editPropertytaxpayment.do?do=getCombo

टीप: 8 ऑगस्ट 2017 पर्यंत संबंधित ऑथॉरिटीच्या संकेतस्थळांवरून लिंक्स घेतलेल्या आहेत.

 

मालमत्ता कर कॅलक्युलेशन

पुण्यात मालमत्ता कर

पीएमसी ऑनलाइन मालमत्ता कर कॅल्क्युलेटर प्रदान करते, ज्यात आपण खालील माहिती भरू शकता आणि आपल्या प्रॉपर्टीवर आपल्याला किती कर भरावा लागेल हे आपल्याला कळेल : स्थान, क्षेत्र, उपयोग, प्रकार, एकूण प्लिंथ क्षेत्र, बांधकाम वर्ष.

बंगळुरुमध्ये मालमत्ता कर

मालमत्ता कर कॅलक्युलेशनसाठी बीबीएमपी युनिट एरिया व्हॅल्यू (यू ए व्ही) प्रणालीचे अनुसरण करते.

मालमत्ता कर (K) = (G -I)x 20%

जेथे  G= X+ Y+ Z आणि I = G x H/ 100

(G = निव्वळ युनिट क्षेत्रफळाची किंमत;  X= भाड्याने असलेले क्षेत्रफळ x प्रत्येकी चौरस फूट प्रॉपर्टी x 10 महिने; Y= मालमत्तेचे स्वत: ची व्याप्त क्षेत्र x प्रॉपर्टीचा प्रति फूट दर 10 महिने; Z= वाहन पार्किंग क्षेत्र x वाहनाच्या पार्किंग क्षेत्राचा प्रति चौरस फूट दर x 10 महिने; H= घसारा टक्केवारी, जी प्रॉपर्टीच्या वयावर अवलंबून असते)

मुंबईत मालमत्ता कर   

बीएमसी मालमत्ता कर कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅपिटल व्हॅल्यू सिस्टम (सी व्ही एस)चा वापर करते.  बी सी.चॅटर्जी पुढीलप्रमाणे कॅल्क्युलेट केला जातो :

मालमत्तेची कॅपिटल व्हॅल्यू X सध्याचा (चालू) प्रॉपर्टी टॅक्स रेट (%) x यूजर कॅटेगरी (Weight for user category)

दिल्लीमध्ये मालमत्ता कर

दिल्लीतील महानगर पालिका संपूर्ण शहरभर मालमत्ता कर मोजणीकरणासाठी ‘युनिट एरिया सिस्टम’ चा वापर करते . कॅल्क्युलेशनसाठी वापरण्यात येणारा सूत्र खालीलप्रमाणे आहे:

मालमत्ता कर = वार्षिक मूल्य x कराचा दर

जेथे

वार्षिक मूल्य = प्रत्येक चौरस मीटर मध्ये एकक क्षेत्र मूल्य  x मालमत्तेचे एकक क्षेत्र x  मालमत्तेचे वय  x मालमत्तेचा वापर X  संरचना घटक x कब्जा घटक

चेन्नई मधील मालमत्ता कर

ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (जीसीसी) मालमत्तेच्या वार्षिक भाड्याच्या मूल्य कॅल्क्युलेट करण्यासाठी, वाजवी लाभाची किंमत (आरएलव्ही) घेते. मालमत्ता कर  कॅल्क्युलेट करताना जीसीसी खालील बाबींचा विचार करते-

प्लिंथ क्षेत्र

मालमत्ता जेथे आहे त्या भागाचे मूळ दर

इमारत वापर (निवासी किंवा अनिवासी)

भोगवटाचे स्वरूप (मालक किंवा भाडेकरी)

इमारतीचे वय

हैदराबादमध्ये मालमत्ता कर

हैद्राबादमध्ये मालमत्ता कराचा दर वार्षिक भाडे मूल्यावर अवलंबून असतो आणि ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (जीएचएमसी) निवासी मालमत्ता कराकरता स्लॅब रेटचा अवलंब करते.

जीएचएमसी मालमत्ता कर कॅल्क्युलेट करण्यासाठी खालील सूत्र वापरते:

वार्षिक मालमत्ता करा = प्लिंथचे क्षेत्रफळ X प्रति चौरस फूट मासिक भाड्याचा दर X 12 X  (0 .17 – 0 .30 ) मासिक भाड्याच्या दराप्रमाणे आणि स्लॅब रेटनुसार – 10 % घसारा + 8 % वाचनालय सेस

कोलकातामध्ये मालमत्ता कर

मार्च 2017 मध्ये, मालमत्ता कर कॅल्क्युलेट करण्यासाठी नवीन युनिट एरिया आकलन (यू ए ए) प्रणाली कोलकाता नगरपालिका (केएमसी) मध्ये मंजूर केली गेली. प्रॉपर्टी टॅक्स कॅल्क्युलेट करतांना विविध घटकांच्या संकल्पनाचा (एम एफ) वापर करतात, कारण एकाच ब्लॉकमध्ये विविध प्रकारची घरे असतात.

युनिट एरिया आकलन प्रणाली अंतर्गत वार्षिक मालमत्ता कर खालील सूत्र वापरून,कॅल्क्युलेट केला जातो :

वार्षिक कर = बेस युनिट एरिया व्हॅल्यू x कवर केलेली जागा / जमीन क्षेत्र x स्थान एम एफ मूल्य X वापर माफ मूल्य X एम एफ मूल्य X स्ट्रक्चर एम एफ व्हॅल्यू X ऑक्युपेन्सी एम एफ व्हॅल्यू  X टॅक्सचा दर (एच बी करसह)

(टीप: एच बी कर म्हणजे हावडा ब्रिज कर, जी विशिष्ट वॉर्डमध्ये असलेल्या मालमत्तांवर लागू आहे.)

अहमदाबादमध्ये मालमत्ता कर

अहमदाबाद महानगरपालिका (एएमसी) त्याच्या भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर  कॅल्क्युलेट करते. मालमत्ता कराच्याच्या स्वहस्ते मोजणीसाठी सूत्र खालीलप्रमाणे आहे:

मालमत्ता कर = एरिया X  रेट X( F1 F2 XF 3 XF 4 XFn)

जिथे

F1 = प्रॉपर्टीच्या ठिकाणास दिलेले महत्व

F2 = प्रॉपर्टी  प्रकार दिले महत्व

F3 = प्रॉपर्टी च्या वयाला दिलेली महत्व

F4 = निवासी इमारतींना असलेले महत्व

Fएन =  प्रॉपर्टीच्या वापरकर्त्याला देण्यात आलेले महत्व

गुरूग्राममध्ये मालमत्ता कर

गुरुग्राममधील मालमत्ता कर    दोन घटकांवर आधारित आहे- क्षेत्र आणि वापर (निवास / विना-व्यापारी आणि व्यावसायिक). गुरुग्राम महानगरपालिकेच्या(एमसीजी ) च्या वेबसाइटवर, आपला मालमत्ता कर  भरण्याची ऑनलाईन सोय आहे. जेव्हा आपण आपला युनिक प्रॉपर्टी आयडी नंबर किंवा आपले नाव आणि पत्ता भरता तेव्हा तुम्हाला किती मालमत्ता कर  भरायचा आहे हे दर्शविले जाईल.

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Comments

comments